बार्शीटाकळी येथील धाबा आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम




अकोला,दि. 1 (जिमाका)- महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 जानेवारी रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा येथील बाबासाहेब धाबेकर आदिवासी आश्रमशाळा व सिद्धेश्वर प्राथमिक आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन 1098, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शीका बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय सोप्या भाषेत अनुभव कथन करीत सोशल मिडीयाचे दुष्परीणाम, बालकांची मदत यंत्रणा 1098 या बाबत मार्गदर्शन केले. सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक अॅड. मनिषा भोरे यांनी पॉक्सो कायदा तसेच सखी वन स्टॉप सेंटरची कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. तर प्रिया इंगळे यांनी बालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश शिंदे यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ