महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज निकाली काढा - सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड


     अकोला दि.10(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील  विद्यार्थांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडिबिटी प्रणालीवर विविध योजना राबविल्या जातात. महाडिबिटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सरासरीच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे संबधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती  योजनेचे ऑनलाईन अर्ज  तातडीने निकाली काढा, असे निर्देश सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी दिले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडिबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविल्या जातात.

 माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नविन व नुतनीकरणाचे वरील योजनांचे अर्ज  नोंदणीकृत करण्यासाठी दि.21 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टलच्या डॅशबोर्डवरील सद्यस्थीतीचे अवलोकन केले असता अनुसूचीत जाती प्रवर्गाचे सन 2021-22 वर्षात 17 हजार 485 तर सन 2022-23 वर्षात 12 हजार 902 अर्ज महाविद्यालयस्तरावर भरण्यात आले आहे. संपुर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संबधीत महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज महाडीबीटी संकेत स्थळावर भरून घेण्याची तात्काळ कार्यवाही करावी. जेणेकरून पात्र विद्यार्थी महाडिबिटी प्रणालीवर आवेदनपत्रे भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ