आगर येथे तणावमुक्त शिबीर;७५ जणांची तपासणी

 अकोला,दि.२१(जिमाका)- प्राथमिक आरोग्य केंद्र आगर येथे तणावमुक्तीसाठी आयोजित शिबिरात ७५ जणांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हर्षल चांडक, वैद्यकीय अधिकारी डॉ. खान, डॉ. मेघना वानखडे, प्रदीप इंगोले, अशोक जाधव, सोपान अंभोरे. प्रतिभा तिवाणे यांची उपस्थिती होती. डॉ. चांडक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मानसिक आजारांबाबत समाजात जनजागृती होणे आवश्यक असून व्यसनाधिनता, स्मृतीभ्रंश, ताणतणाव, चिंता, नैराश्य इ. बाबत टेलिमानस १४४१६ या टोल फ्रि क्रमांकाच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबिरात ७५ जणांची तपासणी करुन त्यांना समुपदेशन देण्यात आले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सय्यद आरिफ, कविता रिठ्ठे, गटप्रवर्तक, आशा सेविका आदींनी परिश्रम घेतले.

०००००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ