कोठारी कॉन्व्हेन्ट येथे जनजागृती कार्यक्रम


अकोला, दि. 10(जिमाका)-  महिला व बालविकास विभाग, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज(दि.10) निशु नर्सरी व कोठारी कॉन्व्हेन्ट, अकोला येथे जनजागृती कार्यक्रम राबविण्‍यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, पॉक्सो 2012, बालकांसाठी कार्यरत असणारे यंत्रणा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड. अनिता गुरव शिंदे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात सोप्या पद्धतीने बालकांना कायद्याबाबत माहिती दिली. बालकल्याण समिती सदस्य शिला तोष्णीवाल यांनी सोशल मिडीयाचे दुष्परीणाम, बालकांच्या घ्यावयाची काळजी व चाईल्ड लाईन 1098 यावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, कोठारी कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापीका अंजली कडलस्कर, शिक्षीका दिपाली पांडे, राखी मिश्रा, ममता नेमाडे व शिक्षक सुनिल दांदळे व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन मिता गुलाखे यांनी तर आभार प्रदर्शन मिता गुलाखे यांनी केले. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ