मानसिक आजाराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम


अकोला,दि.15(जिमाका):-  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 13 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर येथे तर बुधवार दि. 15 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,सावरा(मंचनपूर) येथे तणाव मुक्त शिबिराचे आयोजन  करण्यात आले. यावेळी विविध जनजागृती कार्यक्रमाव्दारे मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तणाव मुक्त शिबीरांमध्ये उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. भावना हाडोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. हर्षल चांडक यांनी ग्रामीण भागात वाढत असलेले व्यसनधीनता, स्मृतिभ्रंश, डिप्रेशन व इतर मानसिक आजाराविषयी तसेच टेलीमानस 14416 या टोल फ्री क्रमांकाबाबतही उपस्थितांना माहिती दिली.

शिबीरामध्ये रूग्णांची तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र, पातूर येथील शिबीरांमध्ये 92 रुग्णांची नियमित तपासणी तर 25 रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात आली. तसेच  प्राथमिक आरोग्य केंद्र,सावरा (मंचनपूर) येथे 92 रुग्णांची नियमित तपासणी तर 25 रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात आले व इतर रुग्णांना औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ प्रदिप इंगोले, सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव, मनोविकृती परिचारीका प्रतिभा तिवाणे, सय्यद आरिफ, कविता रिठ्ठे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, गटप्रर्वतक, आशा स्वयंसेवीका उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ