जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक: प्रमुख मार्गांवरील अपघातप्रवण स्थळे निश्चित करुन चिन्हांकित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





अकोला,दि. (जिमाका)- जिल्ह्यातील, महामार्ग, राज्यमार्ग व अन्य महत्त्वाचे मार्ग यावरील अपघातप्रवण ठिकाणांची निश्चिती करुन त्याठिकाणी वाहनचालकांना सतर्क करणारी चिन्हे लावून मार्ग चिन्हांकित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, मनपा उपायुक्त निला वंजारी, कार्यकारी अभियंता सरनाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पी.डी. पाटील. पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आयआरडीए या प्रणालीवरुन नोंदविल्या जाणाऱ्या अपघातांची संख्या व स्थळे ओळखून असे अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावे व तेथे वाहनचालकांना सतर्क राखणारी चिन्हे लावावी. जेणेकरुन अपघात रोखता येतील. अशा ठिकाणांबाबत कार्यवाही पूर्ण करावी. निर्माणाधीन रस्त्यांवरही वाहनचालकांसाठी वळण मार्गांबाबत असणाऱ्या सुचना ठळकपणे लावण्यात याव्यात. आवश्यक त्याठिकाणी रस्त्यांची दुरुस्तीही करावी,असे निर्देशही श्रीमती अरोरा यांनी दिले. सुरक्षित रस्ते वाहतुकीसंदर्भात जनजागृती करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम