राष्ट्रीय लोक अदालत; 10 हजार 986 प्रकरणे निकाली: 35 कोटी 37 लाखांचा केला दंड वसूल

 




 अकोला दि. 12(जिमाका)- अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीस 10 हजार 986 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून 35 कोटी 37 लाख 91 हजार 826 रुपयांची वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि.11) राष्ट्रीय लोक अदालतीस प्रकरणे निकाली काढण्यात आले. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 13 हजार 360 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली. यापैकी 10 हजार 986 प्ररणे निकाली काढण्यात आली तर खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून 35 कोटी 37 लाख 91 हजार 826 रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित 13 हजार 360 प्रकरणांपैकी 1 हजार 663 प्रलंबित प्रकरणात व एकूण 9 हजार 323 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून 10 हजार 986 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम 138 एन. आय. ॲक्ट तसेच ग्रामपंचायत घरपट्टी/ पाणीपट्टी व महानगरपालिकांचे कर वसूलीचे तसेच बी.एस.एन.एल. व बॅकांच्या खटलापूर्व प्रकरणात तडजोड होवून 35 कोटी 37 लक्ष 91 हजार 826 वसुल झाले आहेत, असे श्री पैठणकर यांनी सांगितले. 

जिल्हा न्यायालयात आयोजित लोक अदालतीमध्ये श्रीमती सुवर्णा केवले व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात निगोशिएबल इन्सट्रुमेन्टस् ॲक्ट च्या कलम -138 खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे ,कामगार वाद प्रकरणे, विज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे,  कोर्टात प्रलंबित प्रकरणे तसेच लोक अदालतीच्या मार्फत विधी विषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक डी.पी.बाळे, संजय रामटेके, राजेश देशमुख, आर.बी. तेलगोटे, हरिष इंगळे, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयाचे सहकार्य लाभले.

0000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ