ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम घोषित

 अकोला,दि.२१(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे.

मतदार यादी कार्यक्रम याप्रमाणे-

प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी- शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी २०२३

हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी- शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी ते गुरुवार दि.२ मार्च २०२३.

 प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी- गुरुवार दि.९ मार्च  २०२३.

अकोला जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७२  सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी तर थेट सरपंचपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यात ५ ग्रापंचे ५ सदस्य, अकोट तालुक्यात ६ ग्रापं चे १० सदस्य (एक सरपंचपद),  मुर्तिजापूर तालुक्यात १३ ग्रापं चे १६ सदस्य, अकोला तालुक्यात ११ ग्रापंचे १५ सदस्य (एक सरपंच पद), बाळापूर तालुक्यात १२ ग्रापं चे १७ सदस्य (एक सरपंचपद),  बार्शीटाकळी तालुक्यात ५ ग्रापंचे ४ सदस्य (एक सरपंच पद), पातूर तालुक्यात ६ ग्रापंचे ५ सदस्य (एक सरपंचपद) याप्रमाणे समावेश आहे, अशी माहिती  उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं/जिप/पंस. निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ