मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला येथे आगमन व स्वागत





अकोला
, दि.12(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अकोला येथे आगमन झाले. यावेळी शिवणी विमानतळावरील हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, आ.विप्लव बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा