राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ; आठ विभागातील ३५० खेळाडू सहभागी




अकोला,दि. १४(जिमाका)- राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा (१४ वर्षा आतील) स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई स्टेडीयम येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील ३५० खेळाडुंनी (१४ वर्षाआतील) सहभाग घेतला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले.  उद्घाटनास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, क्रीडा व युवक सेवा अमरावतीचे उपसंचालक विजय संतान, एनसीसी कार्यालयाचे कर्नल सि.के. बडोला, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य.) डॉ. सुचिता पाटेकर, हॉकी अकोला संघटनेचे अध्यक्ष डॉ.अभय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी उदय पवार आदी उपस्थित होते. खेळाडुंना सदभावनेची प्रतिज्ञा देण्यात आली.

या स्पर्धेत राज्यातील ८ विभागातील ३५० खेळाडू व १८ क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहे. या शालेय हॉकी स्पर्धा बुधवार दि. १५ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या स्पर्धेचे सामने स्व. वसंत देसाई स्टेडीयम, अकोला व कवायत मैदान पोलिस मुख्यालय, अकोला येथे होणार आहे. १४ वर्षाखालील मुलींचे सामने वसंत देसाई स्टेडियम व १४ वर्षाखालील मुलांचे सामने कवायत मैदान पोलीस मुख्यालय, अकोला येथे होणार आहे. सेवा निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, चंद्रकांत उप्पलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक चित्रा ढाकणे, महेश पवार, राधाकिसन ठोसरे, प्रशांत खापरकर, उगवेकर, दीपक व्यवहारे,  सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा मंडळ व जिल्हा संघटना हे स्पर्धांच्या आयोजनासाठी परीश्रम घेत आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ