पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा:288 उमेदवारांचा सहभाग; चौघांना निवडपत्र तर 102 जणांची प्राथमिक निवड









अकोला, दि.8(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भरती प्रक्रियेसाठी 288 उमेदवारांनी सहभाग नोंदविला आला. यामध्ये  निवडप्रक्रियेनंतर 102 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली तर चार जणांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले.

         जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात रॅलीज इंडीया लिमीटेड अकोला, एंडुरन्स टेक्नॉलॉजी लि.औरंगाबाद, रुचा इंजिनिअरींग प्रा.लि.पूणे, अजय पॉली प्रा.लि.पूणे, पीपल ट्री वेन्चर प्रा.लि. पूणे व इन्डोरमा प्रा.जि.नागपूर या कंपण्यानी सहभाग नोंदविला. यामध्ये 260 पदांसाठी भरती  प्रक्रिया राबविण्यात आली.  त्यात प्रमुख सहा आस्थापनांनी  सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 288  उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर 102 जणांची  प्राथमिक निवड तर चार जणांना निवडपत्र देण्यात आले.

             उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकर, शासकीया औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे उपप्राचार्य सुनिल घोंगडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक रोहित बावस्कर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ