जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले

 अकोला,दि. 10(जिमाका)-जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करायची आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

अशासकीय सदस्याची संख्या याप्रमाणे : गोशाळा किंवा पांजर पोळ संस्थापैकी एका संस्थेचा अध्यक्षाचे एक पद, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाचे सदस्यांचे दोन पद, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशीत केलेले दोन व्यक्ती, मानव हीत  किंवा कल्याणासाठी कार्य करणारे सदस्यांचे सहा अशासकीय पद.

 अकोला जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी समितीवर निवड करण्यासाठी इच्छुकांनी आधार कार्ड, बायोडाटा व पशुमित्र अथवा सेवाभावी संस्थेत काम करीत असल्यास पुरावा इ. कागदपत्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, अकोला येथे अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ