स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात ‘चिकन महोत्सव’ : आहारातील पोषण मूल्य घटकांचे महत्त्व ओळखा- डॉ. धनंजय दिघे

 










अकोला,दि.२२(जिमाका)- दैनंदिन आहारात पोषण मूल्य घटकांचा समावेश असणं आवश्यक आहे. त्यातूनच शरीराला आवश्यक उर्जा, पोषण मिळते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन शरीराला योग्य फायदा होतो, असे प्रतिपादन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी  केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या वतीने आज चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट योग्य वाढ झालेल्या चिकनचा आहारात वापर करण्याबाबत जनजागृती हे होते.

या महोत्सवास अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कुक्कुटपालन शास्त्र विभागप्रमुख डॉ. डॉ.सतिश मन्वर,  डॉ. सुनिल वाघमारे, डॉ. प्रशांत कपाले, डॉ. मंगेश वाडे, डॉ. सुनिल हजारे,  डॉ. डी.एम. बधुकाळे, डॉ. मंगेश इंगवले, डॉ. रणजीत इंगोले, आदी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. दिघे म्हणाले की, पक्षाच्या मांसातून मिळणारे पोषण मूल्य, सुक्ष्म द्रव्ये, प्रथिने, अमिनो आम्ले, चव इ. घटकांबाबत विचार करुन त्यानुसार योग्य कालावधीत ते आहारात समाविष्ट केले गेले पाहिजे. त्यासाठी चिकनचे मांस हे तीस दिवसांपर्यंतच्या कालावधीत आहारात समाविष्ट झाले पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तुलनात्मक अभ्यासही केला आहे.

डॉ. सुभाष पवार यांनीही आपल्या मार्गदर्शनात आहार जनजागृतीवर भर द्यावा असे मत व्यक्त केले. कुक्कुटपालन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतिश मन्वर यांनी प्रास्ताविक चिकन महोत्सव आयोजनाची भुमिका स्पष्ट केली.

चिकन महोत्सवात माहिती देण्यात आली की, ब्रॉयलर प्रकाराचे चिकन ३० दिवसांपर्यंत आहारात आणल्यास त्यातील अन्नघटक हे उत्तम पातळीपर्यंत लाभतात. शिवाय त्याची चव, पोत इ. बाबीतही हे मांस उत्तम असते. यासंदर्भात माहितीचे सादरीकरण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर सुग्रास पद्धतीने बनवलेले चिकन उपस्थितांना देण्यात आले. सुत्रसंचालन डॉ. मंगेश वड्डे यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत कपोले यांनी केले.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ