निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण

 


अकोला,दि.२४(जिमाका)- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत तसेच किमान कौशल्य विकास कार्यक्रम, जिल्हा सर्वसाधारण योजना अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४५ दरम्यान इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, फोटो तसेच आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन संबंधित संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता व शैक्षणिक पात्रता याप्रमाणे-

१)      शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला- इलेक्ट्रिशियन डोमेस्टीक सोल्युशन (३०) किमान १० वी पास.

२)     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) अकोला- सिव्हींग मशीन ऑपरेटर (३०) किमान १० वी पास (मुलींकरीता).

वेब डेव्हलपर(३०) पदवीधर (मुलींकरीता)

३)     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट- असिस्टंट सर्व्हेअर (३०) किमान १० वी पास.

४)    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा- फिटर फॅब्रिकेशन (३०) किमान १० वी पास.

५)    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुर्तिजापूर- फोर व्हिलर सर्व्हिस टेक्निशिअन (३०) किमान १० वी पास.

६)     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापूर- फोर व्हिलर सर्व्हिस टेक्निशिअन व प्लंबर जनरल (३०) किमान १० वी पास.

७)    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीटाकळी- इलेक्ट्रिशियन डोमेस्टीक सोल्युशन (३०) किमान १० वी पास.

८)    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूर- टू व्हिलर सर्व्हिस टेक्निशिअन (३०) किमान १० वी पास.

या प्रमाणे, त्या त्या संस्थेत जाऊन इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम’, या तत्त्वाने प्रवेश दिला जाईल. प्रवेश क्षमते इतकी प्रशिक्षणार्थी संख्या झाल्यावर प्रशिक्षणास सुरुवात होईल. काही अडचणी आल्यास सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ