पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा; विषय तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन


अकोला, दि. 28 (जिमाका)- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शुक्रवार दि.3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सेमिनार हॉल, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, मूर्तिजापूर रोड अकोला येथे होणार आहे. या कार्यशाळेत विषय तज्ज्ञाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्नातकोत्तर पशुवैद्यक व पुशविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि.जी. दिघे यांनी दिली.

           प्रशिक्षण कार्यशाळा दि. 3 व 4 मार्च रोजी तर 13 ते 17 मार्च या कालावधीत स्नातकोत्तर पशु विज्ञान संस्था आणि आदर्श गोशाळा म्हैसपूर येथे होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर तर भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनिलजी मानसिंहका या विषय तज्ज्ञाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आदर्श गोशाळा म्हैसपूर येथे प्रत्यक्ष प्रात्यशिकेव्दारे माहिती दिली जाणार आहे. तरी प्रशिक्षण कार्यशाळेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ