पोस्ट विभागाचा उपक्रम; बँक खाते आधार संलग्न सुविधा गावातच:12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम



अकोला दि. 2(जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सन्माननिधी वितरीत केल्या जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आवश्यक आहे. यासाठी पोस्ट विभागाने पोस्टमनच्या माध्यमातून  गावातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि. 12 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्‍ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हफ्त्यात 2 हजार रुपये प्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये मानधन देण्यात येतो. या योजनेचा तेरावा हफ्ता जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. राज्यात सद्यास्थितीत 14 लाख 32  हजार लाभार्थ्यांचे बँक खात आधार क्रमांकास संलग्न नाही. त्यात जिल्ह्यातील 25 हजार 901 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना तेराव्या हफ्त्याचा लाभ जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाव्दारे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँक उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या गावात येऊन सेवा देण्यात येणार आहे. त्यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही त्याचे खातेही उघडून देण्यात येणार आहे.

1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या तेराव्या हफ्त्यांच्या लाभासाठी आधार सलग्न बँक खाते अनिवार्य आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत दि. 1 ते 12 फेब्रुवारी कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याकरीता  इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून गावातील पोस्टमास्तर लाभार्थ्यांना संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाती उघडून देतील. आधार कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींनी इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. तरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी या मोहिमेचा लाभ घ्याव्या, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ