हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



अकोला, दि. 28 (जिमाका)- नेहरू युवा केंद्र व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा दि. 26 फेब्रुवारी रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड ता. तेल्हारा  येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली.  

            या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कारपोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यानी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. या मेळाव्यात ऑनलाईन नोंदणीव्दारे 288 तर प्रत्यक्षात 212 तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी 52 तरुणांचे प्राथमिक मुलाखती घेऊन 31 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या मेळाव्यात सीसीडी, एल.एफ. लॉजिस्टिक, युआयडीआयए प्रोजेक्ट, टेक महिंद्रा इत्यादी उद्योग कंपन्यांनी सहभाग घेतला.

            मेळाव्यामध्ये मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये राजीव खारोडे यांनी  स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व अधिकारी होण्यासाठी जिद्द, चिकाटी जोपासावी असे सांगितले. तर दीपिकाताई देशमुख यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध असल्याचे युवक व युवतींना पटवून दिले. गारमेंट फॅक्टरी नागपूर जनरल मॅनेजर प्रसन्न आंबेकर व प्रीती देशमुख यांनी युवकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र व मुलाखत पद्धती याविषयी माहिती दिली.

मेळाव्याचे उद्घाटन हिवरखेडचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी केले. यावेळी हिवरखेड महात्मा फुले शिक्षण संस्थाचे अध्यक्ष अनिलकुमारजी भोपळे, महात्मा फुले शिक्षण संस्थाचे कार्यवाह श्यामशील भोपळे, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, धीरज बजाज, महादेवजी खोणे, प्रसन्न आंबेकर, प्रीती देशमुख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान यांनी तर आभार डॉक्टर मयूर लहाने यांनी मानले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ