अकोला , दि.२९(जिमाका)- जिल्ह्यातील उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अधिक सजग होऊन आपल्या उत्पादनांची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी शासनामार्फत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा लाभही उद्योजकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उद्योग संचालनालय,उद्योग विभाग, लघु उद्योग विकास बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने दी अकोला अर्बन बॅंक येथे ‘ गुंतवणुक वृद्धी, निर्यात प्रचलन,एक जिल्हा एक उत्पादन ’ याविषयावर उद्योजकांचे दोन दिवसीय (दि.२९ व ३०)प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या विभागीय व्यवस्थापक मंजुषा जोशी,जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग लघुभारतीचे आशिष चंद्रा, अकोला इंड्स्ट्रीयल असो. चे उन्मेष मालू,व्यवसाय सुलभता ‘मैत्री सेवा’ चे राजकुमार कांबळे, सिड्बी नागपूरचे व्यवस्थापक आशिष ...