कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’
अकोला,दि.३(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १४३ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.२) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८८४(४३२७७+१४४३०+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी
दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह
शुन्य.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२९२२६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२५५८९ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२३५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२९२२६ अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८५९४९ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.
दोघांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन मधील दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
आठ
जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८८४(४३२७७+१४४३०+१७७) आहे. त्यात ११३९ मृत झाले आहेत. तर ५६७३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत आठ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः १२२ चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२) दिवसभरात झालेल्या १२२ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे पाच, अकोला
महानगरपालिका येथे ९६,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५, हेगडेवार लॅब येथे सहा चाचण्या झाल्या
त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण १२२ चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयाने
कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा