कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

 


अकोला,दि.2(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 191 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57884(43277+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य   = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 329083  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 325446 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3235 नमुने होते. आजपर्यंत एकूण 329083 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 285806 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शुन्य पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर व  रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

10 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57884(43277+14430+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56735 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 10  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 110 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.1) दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 86, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17, हेगडेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 110 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना