शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.२१);प्रशासनाची सज्जता

 अकोला,दि.(जिमाका)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत  शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन रविवार दि.२१ रोजी करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील परीक्षार्थींसाठी पेपर एक साठी २० तर पेपर दोन साठी १८ परीक्षा केंद्रांवर सोय करण्यात आली आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

या संदर्भात शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन सत्रात घेण्यात येणार आहे. अकोला शहरात पेपर एक साठी २० तर पेपर दोन साठी १८ परीक्षा केंद्र आहे. दोन सत्रात होणाऱ्या या परीक्षेत पेपर एक हा सकाळी दहा ते दुपारी एक तर पेपर दोन  दुपारी दीड ते साडेचार या वेळात होणार आहे. अकोला जिल्ह्यात पेपर एक साठी ६१२२ तर पेपर दोन साठी  ४६५४ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने सज्जता केली आहे. त्यासाठी जिल्हा परिरक्षकांच्या नियंत्रणात पाच झोनल ऑफिसर,  ३८ सहाय्यक परिरक्षक, ३८ केंद्र संचालक व आवश्यकतेनुसार पर्यवेक्षक व समवेक्षक आणि अन्य अनुषंगिक आवश्य्क कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी  चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. सर्व परीक्षार्थींनी उपस्थित राहून परीक्षा द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विस्तार शिक्षण अधिकारी  डॉ. अब्दुल अलीम देशमुख यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ