डाक विभागाच्या खेळाडु भरतीकरीता खेळाडुंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी प्रमाणित करण्याचे आवाहन


अकोला,दि.11(जिमाका)- भारतीय डाक विभागाव्दारे खेळाडू भरती कार्यक्रम जाहिर केला आहे. या पदभरती प्रक्रियेकरीता जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले तसेच प्राविण्यधारक पात्र खेळाडुंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून गुरुवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणीत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.  

केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभाग द्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंच्या विविध पदाकरीता भरतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या खेळाडु भरतीसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडु पात्र ठरणार आहेत, राज्यातील खेळाडुंना विहित वेळेत भारतीय डाक विभागाच्या खेळाडु भरतीकरीता अर्ज सादर करणे शक्य व्हावे या करीता डाक विभागाच्या जाहिरातीच्या तरतूदीनुसार राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंची कामगिरी क्रीडा संचालनालयाद्वारा नमुना क्रमांक चारमध्ये प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.    

जिल्हयातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडु पात्र खेळाडुंनी आपल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह आपले अर्ज दि.18 नोव्हेंबरपर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे करावे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ