ग्रा.पं. रिक्त पदांचा पोटनिवडणूक कार्यक्रम: सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन न स्विकारण्याचे निर्देश; जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक

 अकोला, दि.२३(जिमाका)- निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने राबविण्‍यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार  नामनिर्देशन पत्र मागविण्याचा कालावधी हा  मंगळवार दि.३० नोव्हेंबर ते सोमवार दि.६ डिसेंबर असा आहे. तथापि, या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी  नामनिर्देशन स्विकारण्यात येऊ नये असे  राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी देण्याचा कालावधी संपुष्टात आल्याने आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे,असेही आयोगाचे निर्देश आहे, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं., जि.प., पं.स. निवडणूक विभाग संजय खडसे यांनी दिली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ