खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण




अकोला, दि. 24 (जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचे आज दि. 24 नोव्हेंबर रोजी बॉक्सींग हॉल स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते रिबीन कापून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सीगचे सतिशचंद्र भट, कुस्तीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. कृष्णमुरारी शर्मा, लक्ष्मीशंकर यादव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मयुर नृत्य ॲकॅडमीतील चंचल गुप्ता यांनी नृत्य सादर करुन केले. तसेच खेलो इंडिया स्पर्धामध्ये पदक प्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाक्सर खेळाडूंचे सत्कार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक सतिशचंद्र भट यांनी केले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ