विधान परिषद स्थानिक प्राधिकार निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध; दावे हरकती सात दिवसात मागविल्या

 


अकोला,दि.13(जिमाका)- विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहे. या मतदार यादीत तीन जिल्ह्यातील 821 मतदारांचा समावेश असून या यादीवर दावे व हरकती असल्यास त्या सात दिवसात दाखल कराव्या, अशी माहिती अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकार मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

            विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत झाला असून मोताळा व संग्रामपूर नगर पंचायत वगळून सर्व संस्थाकडून मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहे. त्यात तिन जिल्ह्याच्या मतदारसंघातील एकूण 821 मतदारापैकी 389 पुरुष व 432 स्त्री मतदारांचा समावेश आहे. मतदार याद्या सर्व नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याची खात्री करावी. यादीबाबत काही आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत संबंधित कार्यालयात दाखल करावे, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ