कोविडः 240 अहवालात एक पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज; रॅपिड अॅटिजेनमध्ये दोन पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 240 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 239 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57890(43280+14433+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी दोन = एकूण पॉझिटीव्ह तीन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 330320 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 326682 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3236  नमुने होते. आजपर्यंत एकूण 330320 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 287040 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून तो तेल्हारा तालुक्यातील रहिवासी आहे. तसेच  रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. याची नोंद घ्यावी. 

दोन डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात दोघांना होम आयसोलेशन येथुन डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.

12 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57890(43280+14433+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56739 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 12 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 70 चाचण्यात दोन पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 70 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

       काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे दोन, अकोला महानगरपालिका येथे 25, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 33 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर हेगडेवार लॅब येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 70 चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ