स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 



अकोला, दि.18(जिमाका)- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अमृत महोत्सवनिमित्त शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन प्रभावी उपक्रमाची   अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व विभागांना दिले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचे स्वरुप व अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात  आढावा घेण्यात आला. यावेळी उपआयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे निलेश निकम, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे, क्रीडा अधिकारी दिनकर उजवे, अधीक्षक मिरा पागोरे, जिल्हा उद्योग समन्वयक प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

            आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सर्व विभागाने विविध उपक्रम राबवावे. याकरीता कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याची दक्षता घ्यावी. याकरीता प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी यांची नियुक्ती करुन त्याच्याव्दारे उपक्रम राबवावे. विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. तसेच अमृत महोत्सव उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता आवश्यक निधीचा मागणीपत्र सादर करा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

            भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षानिमित्त जिल्ह्यात एकता दौड, सायकल रॅली, संविधान दिनानिमित्त संविधान वाचन, वक्तृत्व  स्पर्धा, निबंधस्पर्धा, गायनस्पर्धा, बॅनर घडीपुस्तीका व कॉफी टेबलबुकव्दारे स्वातंत्र्यात सहभाग घेतलेल्या व्यक्तीची माहितीपुस्तीका, स्वच्छता व लसीकरण मोहिम अशा विविध उपक्रम प्रशासनाव्दारे राबविण्यात येणार आहे. यावेळी विविध विभागाव्दारे अमृत महोत्सवाबाबतचे सादरीकरण करुन माहिती दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ