ग्रा.प. पोटनिवडणुक; अंतिम मतदार यादीवर हरकती मागविल्या

 


अकोला,दि.12(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार  मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप यादीवर आक्षेप व हरकती दि. 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत संबंधीत तहसील कार्यालयात स्विकारल्या जातील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवार दि. 18 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अधिकारी ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभाग तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर झाला असून रिक्त ग्रामपंचायती पोट निवडणूकीचा तपशिल याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यात 10 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 14 सदस्य,  अकोट तालुक्यात 33 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 82 सदस्य, मुर्तिजापूर तालुक्यात 50 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 120 सदस्य, अकोला तालुक्यात 37 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 64 सदस्य, बाळापूर तालुक्यात 18 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 29 सदस्य, बार्शीटाकळी तालुक्यात 28 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 57 सदस्य, पातुर तालुक्यात 22 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 32 सदस्य, असे एकूण 198 रिक्त ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरिता 398 रिक्त सदस्य पदाकरीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभाग तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ