विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक- ८२२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 अकोला, दि.२३(जिमाका)- विधान परिषदेच्या अकोला बुलडाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असून या मतदार संघात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


यासंदर्भात निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानुसार, या मतदार यादीत आता-

अकोला जिल्हाः- जिल्हा परिषद अकोला-६० मतदार, अकोला महानगरपालिका- ८१ मतदार, अकोट नगरपरिषद-३६, तेल्हारा नगरपरिषद-१९, बाळापूर नगरपरिषद- २६, पातूर नगरपरिषद-१९, मुर्तिजापुर नगरपरिषद-२६, बार्शी टाकळी नगरपंचायत- २०, (एकूण मतदार-२८७)

वाशिम जिल्हाः- वाशिम जिल्हा परिषद-५८, नगरपरिषद वाशिम-३४, नगर परिषद कारंजा-३२, नगर परिषद मंगरुळ्पीर-२१, नगरपरिषद रिसोड-२३,(एकूण मतदार-१६८)

बुलडाणा जिल्हाः- जिल्हा परिषद बुलडाणा-७१, नगरपरिषद बुलडाणा-३१, नगर परिषद चिखली-३०, नगर परिषद देऊळगाव राजा-२१, नगर परिषद सिंदखेड-१९, नगर परिषद लोणार-२०, नगर परिषद मेहकर-२७, नगर परिषद खामगाव-३७, नगर परिषद शेगाव-३२, नगर परिषद जळगाव जामोद-२१, नगर परिषद नांदुरा-२६, नगर परिषद मलकापूर-३२ (एकूण मतदार- ३६७) या प्रमाणे मतदार संख्या आहे.

एकूण मतदार संघात ३८५ पुरुष तर ४३७ स्त्री मतदार मिळून ८२२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ