‘खेलो इंडिया’ बॉक्सींगकरिता बुधवार (दि.17) पर्यत अर्ज करा

अकोला,दि.11(जिमाका)-  देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावे याकरीता केंद्र राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजुर केले आहे. बॉक्सीग या खेळाकरीता जिल्हा क्रीडा संकुल समिती, अकोला येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत होणार आहे. जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्रातंर्गत बॉक्सींग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात खेळाडुंची निवड करण्याकरीता बुधवार दि. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

यासंदर्भात बॉक्सीग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोकृष्ट खेळाडू, अधिकृआतंरराष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य प्राप्त व सहभाग, अतिउच्च कामगिरी किंवा गुणवता प्रमाणपत्र, अनुभव असलेल्या क्रीडा प्रशिक्षकाची बॉक्सीग खेळाच्या प्रशिक्षणाकरीता नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याकरीता प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्ष  वयोगटातील असावा, प्रत्येकी 15 मुलेमुली असे एकुण 30 खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सीग खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 20 वर्षाआतील असावे, खेळाडूची जन्मतारीख  1 जानेवारी 2002 नंतरची असावी, वय 12 वर्ष कमी वयाचे खेळाडूचे खेलो इंडिया व साई नियमाप्रमाणे चाचणी घेऊन निवड करण्यात येईल. इच्छुक पात्रताधारक खेळाडूंनी दि 17 नोव्हेंबरपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधारकार्ड क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, जन्मदाखला व इतर आवश्यक कागदपत्र सांक्षाकीत सत्यप्रती जोडाव्यात. अतिरिक्त माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक  बॉक्सीग सतिशचंद्र भट यांचेशी संपर्क साधावा. असे श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यानी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ