बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू

 


अकोला, दि.16(जिमाका)- सामाजिक न्याय विभागामार्फत बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागास  प्रवर्गातील होतकरु विद्यार्थ्यांना गुणवत्ते व जातीनिहाय ऑफलाईन इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतीगृहात प्रवेशितांना मोफत भोजन, निवासव्यवस्था, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता व स्वच्छता भत्ता दिला जातो.  प्रवेश प्रक्रिया विद्यालय व महाविद्यालय येथे प्रवेशाकरीता राबविल्या जात आहे, असे बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी कळविले आहे. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ