‘बालहक्क सप्ताह’निमित्त विविध उपक्रम; नागरिक व स्वयंसेवी संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन


अकोला,दि.11(जिमाका)-   महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत 'बालहक्क सप्ताह' राबविल्या जाणार आहे. या सप्ताहामध्ये  सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबविण्याल्या जाणार आहे. या सप्ताह कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.  

या बालहक्क सप्ताहामध्ये बालकांचे हक्क आणि अधिकार याबाबत समाजात जनजागृती व्हावी याकरीता विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सायकल रॅली, दत्तक विधानाबाबत माहितीपर सेमीनार, अकोला महानगरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दत्तक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन, बालकांचे सांस्कृतीक कार्यक्रम, स्वाक्षरी अभियान, बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, पॉक्सो कायद्याबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण, बालगृहातील बालकांची सहल तथा अकोला महानगरातील विविध सामाजिक संगठनांचे पदाधिकारी यांच्यासोबत अनाथ बालकांच्या विविध समस्यांचे चर्चा सत्र, बालकांचे हक्क व कायदेबाबत जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, प्रतिपालकत्व योजनेंतर्गत ज्या पालकांनी बालकांना दत्तक घेतले आहे त्यांचे अनुभव कथनत्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे.

बालहक्क सप्ताहातील कार्यक्रम राबविण्यासाठी संयुक्त समितीचे गठन करण्यात आले असुन ही समिती केवळ या बालहक्क सप्ताहापुरतेच कार्य न करता संपुर्ण वर्षभर बालकांचे हक्क आणि अधिकार अबाधीत राखण्यासाठी विवि कार्यक्रम राबविणार आहे. तसेच जिल्ह्यातील गावागावातील दुर्लक्षीत अनाथ असलेल्या बालकांचा शोध घेवुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून त्यांचे संगोपन, काळजी व संरक्षण, आरोग्य, शिक्षण तथा कुटुंब मिळवुन देणे असे कार्य या समितीव्दारे करण्यात येणार आहे. बालहक्क सप्ताहात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता संयुक्त समितीकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ