जिल्‍हा काम वाटप समितीची बैठक स्‍थगित

        अकोला,दि.(जिमाका)- जिल्‍हा काम वाटप समिती ची बैठक मंगळवार दि. ९ रोजी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक  काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे,असे सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी कळविले आहे.

यानिमित्ताने,सर्व सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्‍थाना कळविण्‍यांत येत आहे की, प्रस्‍ताव स्विकारणे सुरु असल्‍याने आपण काम करण्‍यास इच्‍छूक असल्‍यास व काम वाटप समितीच्‍या शर्थी व अटीस पात्र असल्‍यास आपला प्रस्‍ताव प्राथमिक छाननी करीता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा, तसेच ज्‍या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्‍थानी या अगोदर प्रस्‍ताव सादर केलेला असेल त्‍यांचा प्रस्‍ताव पात्र असल्‍यास ग्राह्य धरण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी,असे सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा