विशेष संक्षिप्त पुनरिक्षणांतर्गत मतदार नोंदणी अभियान ; सर्व नागरिकांनी लाभ घ्‍यावा- उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे


        अकोला,दि.10(जिमाका)- भारत निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अंतर्गत मतदार नोंदणी अभियान 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी(महसूल) गजानन सुरंजे यांनी केले आहे.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत  मतदार नोंदणी अभियान दि. 1 नोव्हेंबर पासून राबविण्यात येत असून दि.30 नोव्‍हेंबर पर्यंत या अभियानात 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात शनिवार व रविवार दिनांक 13,1427, 28 नोव्‍हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्‍यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचे मार्फत सर्व मतदान केंद्रावदि.1 नोव्हेंबर पासून प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. तसेच सर्व मतदान केद्रांवर दि. 5 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या मतदार यादीमध्‍ये वास्‍तव्‍यास नसलेल्‍या 24 हजार 214 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍यात आली आहेत. वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांची यादी akola.nic.in/ या संकेतस्‍थळावर पाहण्यास उपलब्‍ध आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्राकरिता असलेल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांनी उपलब्‍ध करुन दिलेल्या प्रारुप मतदार यादीमध्‍ये त्‍यांचे नाव समाविष्‍ट असल्‍याची खात्री करावी. तसेच ज्‍या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट नाहीत अशांनी https://www.nvsp.in/ या संकेतस्‍थळावर मतदार नोंदणी करुन घ्‍यावी. मतदार यादीच्या कार्यक्षेत्रात वास्‍तव्‍यास नसल्‍यामुळे वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांची यादी यापुर्वीच राजकीय पक्षांना पूरविण्‍यात आली असून सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्‍याबाबत सहकार्य करावे. दि.5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर मतदार नोंदणी करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

तसेच मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त निर्देशा नुसार, दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार केंद्रावर मतदार यादी व वास्तव्यास नसलेल्या मतदारांचे नावे वगळण्यात आलेल्या 24 हजार 214 मतदारांच्या यादी वाचना साठी विशेष कार्यक्रम घेणार असून सर्व मतदारांनी मतदार केंद्रावर उपस्थित राहून आपल्या नावाची खात्री करावी, असे आवाहन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी(महसूल) गजानन सुरंजे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ