कोविडःआरटीपीसीआर मध्ये एक पॉझिटीव्ह तर रॅपिड ‘निरंक’

अकोला,दि.८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ६७ अहवाल निगेटीव्ह आले, तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८८७(४३२७९+१४४३१+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२९६७७ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२६०४० फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२३५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२९६७७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८६३९८ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एक अहवाल पॉझिटीव्ह आला. ही रुग्ण एक महिला असून ती अकोला मनपा क्षेत्रातील येथील रहिवाशी आहे.  तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

११ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ५७८८७(४३२७९+१४४३१+१७७) आहे. त्यात ११३९ मृत झाले आहेत. तर ५६७३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ११ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः ३१ चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.७) दिवसभरात झालेल्या ३१ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे १०, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण ३२ चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ