विधान परिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: आजही दोघा उमेदवारांचे चार अर्ज दाखल

 अकोला, दि.२३(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक २०२१ साठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत  दोघा उमेदवारांचे  प्रत्येकी दोन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, आता एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-

वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा)- दोन अर्ज, गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना)- दोन अर्ज.

काल (दि.२२) चार अर्ज व आज चार अर्ज असे एकूण आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम