माजी सैनिकांसाठी एसबीआयमध्ये पदभरती; 15 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 अकोला,दि.12(जिमाका)- स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत माजी सैनिक प्रवर्गातुन राज्यात 335 सुरक्षा रक्षकांची पदभरती होणार आहे. या पदभरतीकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत झालेल्या व पात्रताधारक माजी सैनिकांनी सोमवार दि. 15 नोव्हेंबरपर्यंत  दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या डिस्चार्ज बुक इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.

            पदभरतीकरीता पात्रता :  माजी सैनिकांचे वय दि. 1 ऑक्टोंबर 2021 रोजी 45 वर्षा पेक्षा कमी असावे. आठवी ते पदवीधर शैक्षणीक अर्हता असावी, सैन्य दलात 15 वर्ष सेवा केलेली व सैन्य दलात हवालदार पदापर्यंत असावा. तसेच सैन्य दलात उत्तम चारीत्र असावा. माजी सैनिक हा एवायई/सेफ-1 वैद्यकीय प्रकारात असावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ