कोविडः आरटीपीसीआर एक पॉझिटीव्ह; तीन डिस्चार्ज तर रॅपिड ‘निरंक’

 अकोला,दि.२३(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २५० अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटीव्ह आला, तर होम आयसोलेशन मधील तिघा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८९२(४३२८१+१४४३४+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३३३०९४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२९४५४ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२३८  नमुने होते. आजपर्यंत एकूण ३३३०९४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८९८१३  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  हा रुग्ण अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे. तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. याची नोंद घ्यावी.

तिघांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात तीन रुग्णांना होम आयसोलेशन मधून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

सहा जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८९२(४३२८१+१४४३४+१७७)आहे. त्यात ११३९ मृत झाले आहेत. तर ५६७४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत सहा जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः ८८ चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२२) दिवसभरात झालेल्या ८८ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

       काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे १८,  अकोला महानगरपालिका येथे ४५,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३, तर डॉ. हेडगेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण ८८ चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ