बालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी; १२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण




अकोला
,दि.(जिमाका)- जिल्ह्यात महिला बालविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या बालगृहांमधील बालकांना महिला बालविकास विभागातर्फे आकाशदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंदाच्या दिवाळीत ही बालगृहे याच आकाशदिव्यांनी उजळली होती. या प्रशिक्षणात १२५ बालकांनी आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले व त्यांनी बनवलेल्या ५० हून अधिक आकाशदिव्यांनी ही बालगृहे दिवाळीत उजळली होती.

जिल्ह्यात महिला व बालविकास विभागांतर्गत ०४ बालगृह व ०१ शिशुगृह कार्यरत असुन काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके या बालगृहांमध्ये बालकल्याण समितीच्या आदेशाने दाखल आहेत. बालगृहातील बालकांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी या दिवाळीच्या सुटीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला व चाईल्ड लाईन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व बालगृहांमध्ये आकाश कंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या मध्ये सर्व बालगृहातील प्रवेशितांनी सहभाग घेतला खेळी मेळींच्या वातावरणात आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण घेतांना बालकांचा आनंद आणि उत्साह बघण्यासारखा होता. जो तो पापला आकाश कंदील अत्यंत सुंदर आणि सुबक व्हावा, यासाठी प्रयत्न करीत होता. सर्व बालगृहात मिळून दाखल असलेल्या सुमारे १२५ बालकांनी हे प्रशिक्षण घेतले, या बालकांनी मिळून ५० आकाशदिवे तयार केले. दिवाळीत हेच दिवे बालगृहांवर लावण्यात आले. दिवाळीत बालगृहे याच आकाशदिव्यांनी उजळून निघाले.

जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुर्योदय बालगृह, गायत्री बालिकाश्रम,शासकीय बालगृह, आनंद बालिकाश्रम येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभीये व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी चाईल्ड लाईनचे विकास बनसोड, श्रीमती विद्या उंबरकर, कु.शिवानी यांनी प्रयत्न केले तसेच सूर्योदय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, शासकीय बालगृहाच्या श्रीमती वाढे, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भटकर, आनंद बालिकाश्रमाच्या तपोधीरा दिदी यांचे सहकार्य लाभले.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ