विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी केली मतदान, मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंग रुमची पाहणी






अकोला
, दि.26(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक 2021 करीता निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज मतदान, मतमोजणी केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पाहणी केली.

 आज सकाळी डॉ. पांढरपट्टे यांनी विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक 2021 करीता  अकोला तहसिलअंतर्गत असलेल्या अकोला शहरातील  मतदान केंद्र असलेल्या बी. आर. हायस्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सरकारी गोडावून मधील मतमोजणी केंद्र तसेच स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. नकाशांची पाहणी करुन माहिती घेतली. दुपारनंतर ते अकोट तालुक्यातील व्यवस्थेच्या पाहणीसाठी रवाना झाले.००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ