विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: दोघा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध

 अकोला, दि.२४(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक २०२१ साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची आज छाननी झाली. त्यात दोघा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे या प्रमाणे-

गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया (शिवसेना) चार अर्ज, वसंत मदनलाल खंडेलवाल(भाजपा) चार अर्ज.या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी चार असे एकूण आठ  नामनिर्देशन पत्र, दाखल केले होते, ते सर्व वैध ठरले आहेत. शुक्रवार दि.२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना