उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामांसाठी कोणीही एजंट नाही- आरटीओ जयश्री दुतोंडे

 अकोला,दि.(जिमाका)-  येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे करण्यासाठी कार्यालयाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. तरी अर्जदारांनी आपली कामे स्वतः करावी, कामे सोईस्कर होण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना भेटावे, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपले कामकाज करावे, कोणत्याही अनधिकृत व्यक्ती वा एजंटकडे जाऊ नये,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीमती दुतोंडे म्हणतात की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जनतेच्या कामांसाठी कार्यालयाने कोणत्याही व्यक्तीची वा एजंटची नेमणूक केलेली नाही. कार्यालयाच्या संदर्भातील कोणतेही काम अर्जदारांनी स्वतः करावे, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे जाऊ नये. अर्जदारांना त्यांचे काम चांगले होण्यासाठी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून  योग्य मार्गदर्शन मिळेल व त्यांची कामे विहित वेळेत करुन देण्यात येतील,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम