स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती

             अकोला,दि.(जिमाका)-  स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये राज्यात ७४२५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असून या पदांवर नियुक्तीसाठी सैन्यदलातून निवृत्त झालेल्या पात्र माजी सैनिकांनी अर्ज करावे, असे आवाहन   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. त्यासाठी पात्र माजी सैनिकांनी  दि.१६ पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, एम्प्लॉयमेंट कार्ड सह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात  प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रताः-

या पदांसाठी दि.१ ऑक्टोंबर २०२१ ला ४५ वर्षांपेक्षा वय कमी, इयत्ता आठवी उत्तीर्ण , सैन्यदलातील किमान १५ वर्षांची हवलदार पदापर्यंत  चांगल्या शेऱ्यासह सेवा, या पात्रतेच्या माजी सैनिकांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ