कोविड लसीकरणास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा-जिल्हाधिकारी निमा अरोरा


अकोला,दि.१६(जिमाका)- कोविड लसीकरणाचे लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहिम सुरु करण्यात आली असून मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. यासंदर्भात आज जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.

जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली गेल्या १० तारखेपासुन लसीकरणाची विशेष मोहिम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पहिला डोस घेतलेल्या व्यक्तिंचे प्रमाण आता ५९ टक्के झाले असून दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण २७.२१ टक्के आहे. लोकांना लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इ. उपाययोजनांसोबत रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करणे या उपायांचा अवलंब जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. ग्रामपातळीवर तसेच  शहरातही स्थानिक यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे,असे निर्देश श्रीमती अरोरा यांनी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ