मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश सुरू

 


अकोला, दि.15(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी तसेच सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात इयत्ता 11 व 12 वीकरीता प्रवेश देणे सुरु आहे. अनु.जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह हनुमान बस्ती, अकोला येथे दि.  26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस एस लव्हाळे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ