‘हर घर दस्तक’मोहिम:10 डिसेंबरपर्यंत कोविड लसीकरण करुन घ्या; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

 



अकोला,दि.30(जिमाका)- कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ ही मोहिम सुरु करण्यात आली असून ही मोहिम शुक्रवार दि. 10 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा  नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

काही देशात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटमुळे दहशत निर्माण झाली आहे. ओमिक्रान व्हेरिएंट हा कोरोना विषाणूपेक्षा अधिक घातक आणि वेगाने पसरणारा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावी. ‘हर घर दस्तक’ मोहिम अंतर्गत जिल्ह्यात लसीकरण वेगाने सुरु असून या मोहिमेला 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी घरांच्या जवळ, नजीकच्या केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ