विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

 


अकोला,दि. 29 (जिमाका)- भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार गुरुवार दि. 2 डिसेंबर दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विज व गारांपासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावा, असा इशारा जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी दिला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ