शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू

 अकोला, दि.17(जिमाका)- सामाजिक न्याय विभागामार्फत अकोट व अकोला(नविन) येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतीगृहात प्रवेशाकरीता शुक्रवार दि. 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 अनु.जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवगीग्य मुलींचे शासकीय वसतीगृह पोपटखेड रोड, ता.अकोट, अकोला येथे  तर अकोला(नविन) येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, मित्र नगर, खंडेलवाल लॉन, अकोला येथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत प्रवेशाकरीता अर्ज दाखल करावे, असे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे संबंधित गृहपाल यांनी कळविले आहे. 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ