तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापती पदांची सोमवारी(दि.22) निवडणूक


अकोला,दि.16(जिमाका)-  जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तेल्हारा व अकोला पंचायत समितीमधील रिक्त सभापती पदाच्या निवडणूक मंगळवार दि. 22 रोजी होणार आहे. या निवडणूकीकरीता तेल्हारा व अकोला तालुक्यातील तहसिलदार यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार सभापती पदाची निवडणूकीकरीता अध्यासी अधिकारी सोमवार दि.22 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारतील व दुपारी तीन वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेत सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तेल्हारा पंचायत समितीचे सभापती पद महिला तर अकोला पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण मागासवर्ग प्रवर्गातील राहतील. ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ