पंचायत समिती उपसभापती पदासाठी गुरुवारी(दि.१८) निवडणूक

 अकोला,दि.(जिमाका)-  जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी व पातूर या सहा पंचायत समितीमधील रिक्त उपसभापती पदासाठी निवडणूक गुरुवार दि. १८ रोजी होणार आहे. या निवडणूकीकरीता संबंधित सहा तालुक्यातील तहसिलदार यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

जिल्ह्यात व्हावयाच्या जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीमधील रिक्त पदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार उपसभापती पदाच्या निवडणुकीकरीता अध्यासी अधिकारी म्हणून तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्त अधिकारी गुरुवार दि.१८ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारतील व दुपारी तीन वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभेत उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना